खाली
दाखवलेला केशरी कोन तुम्ही पाहिला असेलच. बर्याच जणांच्या डेस्कटॉप वर हा कोन असेल
याची मला खात्री आहे. ऑपरेटिंग सिस्टम कोणतीही असो पण केशरी कोन असलेला व्हि.एल.सी
मीडिया प्लेअर आपल्या कॉम्पूटर मध्ये इन्स्टॉल असतोच.
![]() |
व्हि.एल.सी मीडिया प्लेअरचा लोगो |
बर्याच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये त्यांचा
इन-बिल्ट व्हिडिओ प्लेअर असतो जस - मायक्रॉसॉफ्ट विंडोज मधील विंडोज मीडिया प्लेअर.
पण तो आपल्याला फारसा आवडत नाही. त्याएवजी VLC Media Player आपल्याला आवडतो....हा प्लेअर
आपल्याला आवडतो याच कारण त्याच्या मध्ये असलेल्या वेगवेगळ्या सोयी-सुविधा. सध्या नंबर
एक वर असलेला हा प्लेअर व सर्वात जास्त वापर असनार्या या प्लेअरची पार्श्वभूमी काय
आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
सर्वात प्रसिद्ध
असलेल्याया या प्लेअरला जन्म दिला तो फ्रान्समधील इकोल सेंट्रल पॅरिस विद्यापीठच्या
संगणक शाखेमधील तरूण विद्यार्थ्यांनी. खर तर हि एक दुर्घटना होती, कारण दर वर्षि इकोल
सेंट्रल विद्यापीठाचा वार्षिक उपक्रम असतो त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे
गट असतात आणि त्या गटांना प्रोजेक्ट्स बनवायचे असतात. व्हि.एल.सी मीडिया प्लेअर हा
देखील 1996 चा एक वार्षिक उपक्रमच होता. विद्यापीठच्या एका गटाने C,C++ प्रोग्रॅमिंग
लॅंगवेज वापरून 1996 साली हा प्लेअर बनवला. पण तेव्हा त्याचे नाव होते VideoLAN
Client. विद्यापीठच्या आवारातील इमारतींमध्ये असलेल्या कॉप्मूटरच्या नेटवर्कच्या माध्यमातून
VideoLAN Client सॉफ्टवेअर वापरले जात असे. VideoLAN Client चा उपयोग हा क्लायंट आणि
सर्व्हर मधील असलेले व्हिडिओ पहाण्यासाठी होत होता. याच्या आयकॉनची पण एक मनोरंजक कथा
आहे. केशरी कोन असलेला VideoLAN Client चा आयकॉन हा मुळात वाहतुक ट्रॅफीक मध्ये वापरले
जाणारे साधन आहे. त्यावेळी इकोले सेंट्रल विद्यापीठच्या आजुबाजूच्या रस्त्यावर हे कोन रस्ता वाहतुकसाठी ठेवलेले असायचे तेव्हा बरेच
विद्यार्थी हे कोन उचलून विद्यापीठात आणत असत.
![]() |
वाहतुक ट्रॅफीक कोन |
VideoLAN Client चा प्रोजेक़्ट बनवणारे
विद्यार्थीही हे ट्रॅफीक कोन आपल्या संगणक लॅब मध्ये आणायचे. जेव्हा VideoLAN Client
चा Icon कोणता असावा हा प्रश्न आला तेव्हा त्यांची नजर या ट्रॅफीक कोन वर पडली आणि
त्यांनी हाच Icon वापरला.
1998 साली हा प्लेअर पुन्हा नव्याने
लिहण्यात आला आणि 1 फेब्रुअरी 2000 साली इकोल सेंट्रल विद्यापीठच्या मुख्याद्यापकाने
तो सर्वांसाठी मोफत इंटरनेटवर खुला करुन दिला. VideoLAN Client हे नाव मोठे आणि सामान्य
व्यक्तीला न समजणारे होते त्यामूळे या प्लेअरचे नाव बदलून VLC Media Player करण्यात
आले. VLC प्लेअरचे
सर्व हक्क जरी VideoLan Team कडे असले तरी कोणीही हा प्लेअर डाऊनलोड करु शकतो आणि त्याला
पाहिजे तसा बदल करुन VideoLan Team कडे पाठवु शकतो. VLC प्लेअर हा ओपन सोर्स(Open
Source) प्रोग्रॅम आहे आणि याचे लायसेन्स हे "जनरल पब्लिक लायसेन्स"(GNU
General Public License) आहे. हेच कारण आहे कि ज्यामुळे VLC प्लेअर हा पहिल्या स्थानावरचा
व्हिडिओ प्लेअर आहे. कारण जगभरातील
अनेक सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर या प्रोजेक्टला दरवेळी मदत करतात. हा लोकांनी लोकांसाठी
बनवलेला उत्कृष्ट मोफत व्हिडिओ प्लेअर आहे. आत्ता पर्यंत याच्या अनेक आवृत्त्या आल्या आहेत. याची
1.0.0 हि पुर्णांकी
आवृत्ती 7 जुलै 2009 ला आली आणि 2.0.0 हि आवृत्ती
18 फेब्रुअरी 2012 ला रिलीझ झाली. सध्याची(2013)
आवृत्ती 2.0.6 हि आहे. जर तुम्हि देखिल या जगव्यापी उपक्रमाला हातभार लावण्यास उत्सुक
असाल तर तुम्हि या उपक्रमात सहभागी होउ शकता. यासाठी तुम्हाला प्रोग्रॅमर असण्याची
पात्रता असावी अस काहि नाही. तुम्हि वेगवेगळ्या स्वरुपात मदत करु शकता. याची सविस्तर
माहिती इथे
मिळेल.
Post a Comment