• स्वागतम!!

    स्वागतम!!

    GanSun Inc. च्या मराठी; व्हर्जन वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

  • यांनी जग बदललं!!

    यांनी जग बदललं!!

    या IT कंपन्यांनी खरच जग बदलून टाकल

  • तुमच्या PC मध्ये कोण आहे?

    तुमच्या PC मध्ये कोण आहे?

    व्हायरस का तुमचा डेटा

  • सिक्यूरेटी टेक्निक्स

    सिक्यूरेटी टेक्निक्स

    Encryption आणि Decryption

  • तुम्हाला हॅकिंग बद्दल माहित आहे का?

    तुम्हाला हॅकिंग बद्दल माहित आहे का?

    तुमच्या कॉम्पुटर जगातला एक चोरटा जो तुम्हाला न सांगता तुमच्या PC मध्ये शिरतो आणि तुमचा डेटा हाताळतो.

Showing posts with label Computer Virus. Show all posts
Showing posts with label Computer Virus. Show all posts

तुमचा ऍन्टी-व्हायरस चांगला आहे का?

0 comments
 तसे ऑनलाईन बाजारात बरेच ऍन्टी-व्हायरस सॉफ्टवेअर्स आहेत. पण नक्की चांगला ऍन्टी-व्हायरस कोणता? या पेचात आपण पडतो. बर त्यातलाच एखादा ऍन्टी-व्हायरस आपण खरेदी केला आणि तो व्हायरस काढण्याच काम करतोय हे आपल्याला कशावरून कळेल.


   













त्यासाठी एक "जनरल व्हायरस सिग्नेचर कोड (General Virus Signature Code)
आहे....त्याचा वापर करुन तुम्हि तुमच्या ऍन्टी-व्हायरसला ओळखू शकतो. यालाच  EICAR(European Institute for Computer Antivirus Research) टेस्टींग असेही म्हणतात.
१. प्रथम तुम्ही तुमचा नोटपॅड(Notepad) उघडा....मग त्यात पुढील कोड कॉपी करुन घ्या-

X5O!P%@AP[4\PZX54(P^)7CC)7}$EICAR-STANDARD-ANTIVIRUS-TEST-FILE!$H+H*

२. मग save as विकल्प निवडून Virus.exe या फाईल मध्ये सेव्ह करा.
३. जर तुमचा ऍन्टी-व्हायरस चांगल्या कंपनीचा असेल तर तो ऍन्टी-व्हायरस ह्या 'Test Virus File' ला व्हायरस म्हणुन अलर्ट देईल.......जर अलर्ट दिला नाहि तर समजाव तुम्ही ऍन्टी-व्हायरस घेताना फसलात आणि तुम्हाला चांगल्या कंपनीचा ऍन्टी-व्हायरस घ्यावा लागेल.


Read more

निमडा वॉर्मः जगातिल सर्वात कपटि कॉम्पूटर किडा

0 comments


 ह्या कॉम्पूटरी किड्या बद्दल जेवढ बोलाव तेवढ कमीच......हा वॉर्म(Worm)जर तुमच्या कॉम्पुटर मध्ये शिरला कि समजाव आपल्या साठवलेल्या डेटाची आता वाट लागणारच. अत्यंत कपटि असा हा किडा आपल्या कॉम्पुटर मध्ये येतो तरी कसा? आपल्या कॉम्पुटर सिस्टम पर्यंत पोहचण्यासाठी ह्याच्या जन्मदात्याने(Author of Virus)ह्या किड्याला एकूण पाच मार्ग दाखवले आहे - पहिला ई-मेल पासुन,दुसरा ओपन नेटवर्क पासून,तिसरा वेबसाईट पासून,चौथा Microsoft IIS पासून आणि पाचवा बॅक डोर पासून..... म्हणजे आपण एक मार्ग बंद केला तर ह्याला इतर मार्ग मोकळे असतातच....आणि आपण अशा किती मार्गांवर एकाच वेळी लक्ष ठेवणार.


 तुम्ही जर एखाद्या लागण झालेल्या वेबसाईटला भेट दिली आणि तिथ जर हा "निमडा कीडा" आरामात बसला असेल(तो नेहमी तुमचीच वाट बघत बसलेला असतो) तर प्रथम README.EML  (.eml हे Microsoft outlook च्या ई-मेल फाईल च extension आहे.) नावाची फाईल आपोआप डाऊनलोड होईल. तुम्ही न कळत ती फाईल कशाची आहे हे पहाण्याच्या उत्सुकतेने ती ओपन कराल आणि तो किडा सक्रीय होईल. जर तुमच्या कडे ऍन्टीव्हायरस सॉफ्ट्वेअर असेल तर ठीक......नाही तर एकदा का तो सक्रीय झाला कि आपल्या कॉम्पुटर ची वाट लागण्यास सुरुवात झालीच समजा. अस काय असेल हो त्या README.EML फाईल मध्ये...... माझ उत्तर अस कि फक्त तिन ओळीचा जावा स्क्रिप्ट भाषेत(Java Script Language) लिहलेला कोड! बाकी फार काही नाही फक्त तिन ओळीचा कोड!...तुम्हाला पहायचाय का तो कोड?...... हो,असेल तर पहा.

<script language="JavaScript">
window.open("readme.eml", null, "resizable=no,top=6000,left=6000")
 </script>

 हिच README.EML फईल E-mail पासुन सुध्दा पसरते…..गंमत म्हणून जर हा वॉर्म तयार करायचा असेल तर वरिल कोड copy करा....मग Notepad मध्ये हा कोड paste करुन तो README.EML फईल मध्ये सेव्ह करा. सेव्ह केल्या केल्या तुमचा ऍन्टिव्हायरस अलार्म देईल कि हा व्हायरस आहे.(पण हे लक्षात ठेवा कि तुमच्या कडे एक चांगल ऍन्टीव्हायरस असावा.)

 तिसरा मार्ग म्हणजे लोकल नेटवर्कस. जेव्हा आपण आपला कॉम्पूटर लोकल नेटवर्कस वापरुन शेअर करतो तेव्हा जर दुसरया कॉम्पूटर ला ह्या किड्याची लागन झाली असेल तर तो RICHED20.DLL आणि ADMIN.DL ह्या फाईल पासुन पसरतो.ह्या फाईली आपल्याला दिसत नसतात कारण त्या hidden असतात आणि ह्या फाईली आपण त्यांना कधी सक्रिय करू ह्याची वाट न बघता त्या स्वतः सक्रिय होतात

 ह्या निमडा किड्याचा दबदबा इतका अफाट आहे कि याने आत्तापर्यंत 1,60,000 कॉम्पूटर ला बाधित केल आहे. काहि-काहि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी याच्या भितीने इंटरनेटच कनेक्शनच काहि काळ बंद ठेवल होत. आय-टि जगतातील बलाढ्य कंपन्या मायक्रोसॉफ्ट आणि डेल कॉम्पूटर ह्याच्या वेबसाईटलाही ह्या किड्याने सोडल नाही....अहो एवढच काय! मोठ्या-मोठ्या कंपन्यांच्या कॉम्पूटरला सिक्यूरेटी provide करनारी Alternative Computer Technology ह्यांच्या वेबसाईटला सुध्दा ह्या किड्याने घेरल होत. हा तर नेहले पे देहला असाच प्रसंग होता.

 हा किडा मूळ चायना पासुन पसरला आहे अस मानल जात. कारण 18-Sep-2001 रोजी पहिल्यांदा जेव्हा हा किडा सापडला तेव्हा हा वॉर्म तयार करणारयानी ह्या किड्याचे हक्क सुरक्षित ठेवले ते अशे (काय हास्यास्पद आहे व्हायरसची पण Copyright असते!)....."Concept Virus(CV) V.5, Copyright(C)2001 R.P.China." आता हे खरच आहे आहे का फक्त चायना ला बदनाम करण्यासाठी हे हक्क दाखवले आहे ह्याची आजही शंखा व्यक्त केली जाते. निमडा किड्याची दुसरी जात(भाग किंवा व्हर्जन) "मी कोरया देशातील किडा आहे",अस सांगतो....पण एक मात्र नक्की हा किडा प्रथम आशिया खंडातूनच इतर सगळिकडे पसरला आहे.

 ह्या किड्याचा हॅकिंग साठिही वापर होतो..... वेगवेगळ्या ऍन्टिव्हायरस कंपनींनी ह्या किड्याची "Virus Signatures" तयार केली आहेत त्याची नावे पुढिल प्रमाणेः-

Avast!: Win32:Nimda
Avira: W32/Nimda.eml
BitDefender: Win32.Nimda.A@mm
ClamAV: W32.Nimda.eml
Eset: Win32/Nimda.A
Grisoft: I-Worm/Nimda
Kaspersky: Net-Worm.Win32.Nimda or I-Worm.Nimda
McAfee: Exploit-MIME.gen.ex
Sophos: W32/Nimda-A
Symantec: W32.Nimda.A@mm

Kaspersky ह्या ऍन्टिव्हायरस कंपनींनीचा संपुर्ण Virus Report पहायचा असेल तर इथे टिचकी मारा.


-: Review :-


वॉर्मच नाव : निमडा

प्रकार : मल्टी वेक्टर-वार्म(Set of Worms)


वॉर्म सापडलेली तारीख : 18-Sept-2001

देश : चायना किंवा कोरीया

वॉर्मचा आवाका : जवळजवळ संपूर्ण जग

वॉर्मची भाषा : सी प्लस प्लस (C++)

व्हायरसने केलेले एकूण नुकसान : $2.6 billion(दोनशे साठ कोटी अमेरीकन डॉलर) जगातील सगळ्यात जास्त नूकसान करणारा व्हायरस/वॉर्म.

वॉर्मच्या फाईलचे प्रकार : .exe,.eml,.dll

प्लॅटफॉर्म(ऑपरेटिंग सिस्टम) : मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्व ऑपरेटिंग सिस्टम्स


Read more

जोशी बुवांचा व्हायरस : जोशी व्हायरस

1 comments


 तुम्हाला ह्या व्हायरसच नाव कदाचीत माहित असेल.....कुणा एका जोशांच्या सूपुत्रांनी ह्या व्हायरसला 1990 साली जन्माला घातल....आणि आमच्या डोक्याला नसता ताप करून ठेवला. भारतीय व्हायरसच्या इतिहासामध्ये "जोशी व्हायरस" हे नाव नक्की आढळून येईल. बरयाच Antivirus कंपनींनी ह्या जोशी बुवांच्या व्हायरस ची नोंद घेतली...त्यातलीच एक symantec कंपनीच्या फेमस Norton antivirus ने घेतलेली नोंद हि अशी :-  “Joshi is a virus that displays the message if the infected computer is booted on January 5 of any year”  याची संपुर्ण माहिति तुम्ही इथे वाचू शकता.

 ह्या व्हायरसची लागण आपल्या कॉम्पूटरला लागली तर हा काय करतो?....तर माझ उत्तर अस की हा व्हायरस वर्षभर काहिच करत नाही.....तो वर्षभर आपल्या कॉम्पूटरची 5.8KB एवढी जागा घेऊन निवांत त्यात घर करून राहतो...पण एकदा का “05 जानेवारी” हि तारिख उजाडली कि ह्या व्हायरसच्या अंगात येत....आपण कॉम्पूटर चालू केल्या केल्या हा व्हायरस Activate होतो आणि आपल्या स्क्रिन वर हिरव्या अक्षरात "Type Happy Birthday Joshi" हा मेसेज येतो....ह्या मेसेजचा अर्थ असा कि तुम्हि तुमच्या Keyboard वरुन Happy Birthday Joshi अस टाईप काराव.

 मी खोलात जाऊन ह्या मजेशीर व्हायरसचा अभ्यास करण्यासाठी......मूद्दाम हा "Joshi Virus" डाऊनलोड केला आणि एका पेनड्राईव्ह मध्ये copy केला...नंतर कॉम्पूटर रिस्टार्ट करून "5-जानेवारी-2012" हि तारिख सेट केली....मग पेनड्राईव्ह लावला....परत कॉम्पूटर Restart केला. हा व्हायरस बूट सेक्टर(Boot Sector)ह्या प्रकारचा असल्यामुळे तो कॉम्पूटर Boot होतानाच Load झाला. माझा कॉम्पूटर चालू होतच होता तोवर खालील मेसेज आला :-



 पहिल्यांदा तर मी हा मेसेज टाईप केला नाहि म्हणुन कॉम्पूटर सूरूच होत नव्हता…… नंतर मेसेज टाईप केल्यावर कॉम्पूटर ऑन झाला...पण परत काहि वेळाने आपोआप कॉम्पूटर Restart झाला...परत तोच मेसेज...परत मी मेसेज टाईप केला...परत काहि वेळाने कॉम्पूटर Restart.......किमान 10 वेळा असच होत होत (पहिले पाढे पच्चावन!) अक्षरशा मला घाम पुसण्याची वेळ ह्या जोश्यान आणली. कंटाळून मी कॉम्पूटरच फॉरमॅट करून टाकला.
  भविष्यात कधी तुमचा ह्या व्हायरशी सामना झाला तर खरच तुम्हाला हसाव की रडाव काही कळणार नाही.

-: Review :-

व्हायरसच नाव : जोशी/जोश्या

प्रकार : बूट सेक्टर व्हायरस

व्हायरस सापडलेली तारिख : 05-जानेवारी-1990

व्हायरसचा लेखक : मानव जोशी(एक सॉफ्टवेअर इंजीनिअर)

देश : भारत(मुंबई)

व्हायरसचा आवाका : भारत,जर्मनी,अमेरिका,आफ्रिका आणि युरोप खंड

साईज : 5.8(Killo Bytes)

व्हायरसने केलेले एकूण नुकसान : Rs.0.00/-

इन्फेक्शन टाईम : एक दिवस(कोणत्याही वर्षाची 05-जानेवारी तारिख)

प्लॅटफॉर्म(ऑपरेटिंग सिस्टम) : MS-DOS

*हा व्हायरस पहिल्यांदा 1.2MB च्या फ्लोपी पासून पसरला नंतर तो इंटरनेट वरुन जवळ जवळ सगळ्या देशांत पसरला.



Read more