तस पहायला गेल तर गूगलचे बरेच प्रोडक्ट्स आहेत. पण सर्वांना आवडेल असा गूगलचा गूगल ट्रान्सलेटर हा ऑनलाईन प्रोग्रॅम खुपच प्रसिध्द आहे. आपण या प्रोग्रॅमचा वापर करून एका भाषेचे दुसर्या भाषेत रुपांतर करू शकतो.यापुर्वी गुगल भारतातील सहा भाषांसाठी (हिंदी,बंगाली,गुजराती,कन्नड,कन्नड,तेलुगु) सेवा देत होता. पण याच महिन्यात (मे-२०१३) गुगलने आणखी पाच भाषांची सेवा पुरवली आहे. त्या भाषांमध्ये भारतातील मराठी भाषा सुध्दा आहे. हा मराठी माणसासाठी गर्वाचा क्षण आहे. याआधी मराठी इंटरनेट युजर्सनी सर्जी ब्रिन (गूगलचा संस्थापक) याला बरिच पत्र पाठवली होती कि आमची मराठी भाषा तुमच्या गूगल ट्रान्सलेटर वर आणा. त्या सर्व मराठी इंटरनेट युजर्सनीचा आज विजय झाला आहे.
एकुणच याचा अप्रत्यक्ष गुगलाच फायदा आहे कारण मराठी भाषिकांची संख्या हि ७५० लाखाच्या आसपास आहे.गुगलने हि सेवा द्यायच्या आधी हे आकडे नक्किच लक्षात घेतले असणार आणि म्हणुनच आज गुगल ट्रान्सलेटर वर आज मराठी भाषा झळकती आहे. सध्या गुगल ट्रान्सलेटर हिंदी भाषेसाठी संपुर्ण ट्रान्सलेशेनची सेवा पुरवते तर बाकिच्या सहा(मराठी,बंगाली,गुजराती,कन्नड,कन्नड,तेलुगु)भाषाची वाक्यरचनेची बांधनी चालू आहे. यालाच गुगलने अल्फा लॅंगवेज असे नाव दिले आहे.
मराठी बरोबरच बोस्नियन,सेबुआनो,जावाई,माँग चार फॉरेन लॅगवेजही लॉन्च झाल्या आहेत.
या सेवेचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे टिचकी मारा.
Post a Comment