तुम्हाला
ह्या व्हायरसच नाव कदाचीत माहित असेल.....कुणा एका जोशांच्या सूपुत्रांनी ह्या
व्हायरसला 1990 साली जन्माला घातल....आणि आमच्या डोक्याला नसता ताप करून ठेवला.
भारतीय व्हायरसच्या इतिहासामध्ये "जोशी व्हायरस" हे नाव नक्की आढळून येईल. बरयाच Antivirus कंपनींनी ह्या जोशी बुवांच्या व्हायरस ची नोंद घेतली...त्यातलीच एक symantec कंपनीच्या फेमस Norton antivirus ने घेतलेली नोंद हि अशी :- “Joshi is a virus
that displays the message if the infected computer is booted on January 5 of
any year” याची संपुर्ण माहिति तुम्ही इथे वाचू शकता.
ह्या व्हायरसची लागण आपल्या कॉम्पूटरला लागली तर
हा काय करतो?....तर माझ उत्तर अस की हा व्हायरस वर्षभर
काहिच करत नाही.....तो वर्षभर आपल्या कॉम्पूटरची 5.8KB एवढी जागा घेऊन निवांत त्यात घर करून राहतो...पण एकदा का “05 जानेवारी” हि तारिख उजाडली कि ह्या व्हायरसच्या अंगात येत....आपण कॉम्पूटर चालू
केल्या केल्या हा व्हायरस Activate
होतो आणि आपल्या
स्क्रिन वर हिरव्या अक्षरात "Type Happy Birthday Joshi" हा मेसेज येतो....ह्या मेसेजचा अर्थ असा
कि तुम्हि तुमच्या Keyboard
वरुन Happy Birthday Joshi अस टाईप काराव.
मी खोलात जाऊन ह्या मजेशीर व्हायरसचा अभ्यास करण्यासाठी......मूद्दाम हा "Joshi
Virus" डाऊनलोड
केला आणि एका पेनड्राईव्ह मध्ये copy केला...नंतर
कॉम्पूटर रिस्टार्ट करून "5-जानेवारी-2012" हि तारिख सेट केली....मग पेनड्राईव्ह
लावला....परत कॉम्पूटर Restart
केला. हा व्हायरस
बूट सेक्टर(Boot Sector)ह्या प्रकारचा असल्यामुळे तो कॉम्पूटर Boot होतानाच Load झाला. माझा कॉम्पूटर चालू होतच होता तोवर खालील मेसेज आला :-
पहिल्यांदा
तर मी हा मेसेज टाईप केला नाहि म्हणुन कॉम्पूटर सूरूच होत नव्हता…… नंतर मेसेज टाईप केल्यावर कॉम्पूटर ऑन
झाला...पण परत काहि वेळाने आपोआप कॉम्पूटर Restart झाला...परत तोच मेसेज...परत मी मेसेज टाईप केला...परत काहि वेळाने
कॉम्पूटर Restart.......किमान 10 वेळा असच होत होत (पहिले पाढे पच्चावन!) अक्षरशा मला घाम पुसण्याची वेळ ह्या
जोश्यान आणली. कंटाळून मी कॉम्पूटरच फॉरमॅट करून टाकला.
भविष्यात कधी तुमचा ह्या व्हायरशी सामना झाला तर खरच तुम्हाला हसाव की रडाव काही कळणार नाही.
भविष्यात कधी तुमचा ह्या व्हायरशी सामना झाला तर खरच तुम्हाला हसाव की रडाव काही कळणार नाही.
-: Review :-
व्हायरसच नाव : जोशी/जोश्या
प्रकार : बूट सेक्टर व्हायरस
व्हायरस सापडलेली तारिख : 05-जानेवारी-1990
व्हायरसचा लेखक : मानव जोशी(एक सॉफ्टवेअर इंजीनिअर)
देश : भारत(मुंबई)
व्हायरसचा आवाका : भारत,जर्मनी,अमेरिका,आफ्रिका
आणि युरोप खंड
साईज : 5.8(Killo Bytes)
व्हायरसने केलेले एकूण नुकसान : Rs.0.00/-
इन्फेक्शन टाईम : एक दिवस(कोणत्याही वर्षाची 05-जानेवारी
तारिख)
प्लॅटफॉर्म(ऑपरेटिंग सिस्टम) : MS-DOS
*हा व्हायरस पहिल्यांदा 1.2MB च्या फ्लोपी पासून
पसरला नंतर तो इंटरनेट वरुन जवळ जवळ सगळ्या देशांत पसरला.
Interesting virus...............I enjoy while the reading this article
ReplyDelete