आज सकाळीच माझा
मित्र मला म्हणाला,'अरे!! काल
माझ्या वडिलांनी माझा PC चेक
केला....मी एका ड्राईव्ह मध्ये माझा प्राईव्हेट डेटा ठेवला होता..आणि तो मला
कुणालाही दाखवायचा नव्हता पण नेमका तोच डेटा वडिलांच्या हाती पडला...बापान मला खुप
मारल यार!'...........आता त्याने
कोणता डेटा ठेवला होता हे एव्हाना तुम्हाला कळालच असेल.
तुम्हालाही कधी या
प्रसंगातून जाव लागत असेल.........काय म्हणताय नाही?......ठिक आहे ठिक आहे........बर 'तशा प्रकारचा' डेटा जरी तुम्ही
ठेवत नसला तरी काहि इतर फाईल्स जश्या कि स्वतःचे बॅंकींग Documents,Credit/Debit Card Details,आपले
अकाउंट पासवर्ड,आवडती गाणी
ठेवत असालच ना!!
मग हा सर्व डेटा एका
Drive मध्ये
ठेवुन तुम्हाला तो खुप जपायच असेल तर. तर इथे मी एक Drive Protect करण्यासाठी एक मार्ग सांगणार आहे.
खाली दिलेल्या सुचना
नीट वाचा आणि त्याप्रमाने करा:-
1. तुमच्या
पी.सी मधील कमांड प्रोम्ट (Command Prompt) उघडा [शार्टकटसाठी Win+R].

2. मग काळी
विंडो आल्यावर त्यात Diskpart
टाईप
करा आणि एंटर बटण दाबा.मग yes
टाईप
करा आणि एंटर बटण दाबा. तुमच्या समोर वेगवेगळ्या Commands ची list आल्यानंतर list volume अस टाईप करा आणि एंटर बटण दाबा.
3. जर
तुम्हाला E: Drive लपवायचा
असेल तर select volume
E टाईप करा
आणि एंटर दाबा.
4. Drive निवडल्यानंतर
remove letter E अस टाईप
करा आणि पुन्हा एकदा एंटर दाबा.
5. मग तुमचा
कॉप्मुटर Boot(Restart) करा.....रिस्टार्ट
झाल्यानंतर Drive गायब झाला
असेल.
'अरे बाबा
पण माझा Drive परत कसा
आणु?'....असा प्रश्न
सहाजीकच तुम्ही मला विचारणार.OK सांगतो.
I. वरील 1 ते 3 स्टेप पुन्हा perform करा.
II. Drive निवडल्यानंतर assign letter E अस टाईप
करा......तुमचा Drive परत दिसु
लागेल.
हि Trick कशी वाटली ते कमेंट through कळवा.
हि Trick कशी वाटली ते कमेंट through कळवा.
Read more