व्हिडिओंचा खजिना म्हणजेच यूट्यूब!. इंटरनेट वरील एक सुप्रसिध् वेबसाईट
आणि 2012 नुसार जगातली तिसर्या स्थानावरील वेबसाईट. दर महिन्याला 1400 कोटी युजर्स
युट्युबवरील व्हिडीओ बघतात. त्यातील 100 कोटि युजर्स हे दर महिन्याला नवीन असतात. युट्यबवर
दर मिनिटाला 72 तासाएवढा व्हिडीओ अपलोड होत असतो. 2011 च्या आकडेवारीनुसार युट्यबवरील
व्हिडीओ बघणार्याची संख्या इतकी मोठी आहे कि त्याची तुलना करायची झाली तर हि अशी की
- पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीने अत्तापर्यंत 140 व्हिडिओ पाहिलेले आहे. म्हणजेच
2011 सालची जगातली लोकसंख्या गुणीले 140 अबब…. केवढा मोठा आकडा!!! त्याहुन अचंबीत म्हणजे
लोकांमधील व्हिडीओ पहाण्याची नशा.तीपण फक्त 8 वर्षात. होय...! फक्त 8 वर्षात...कारण
8 वर्षापुर्वी म्हणजेच 2005 साली यूट्यूबचा नामोनिषान सुध्दा नव्हता.
यूट्यूबची सुरूवात हि विस-पंचवीसीतील
तीन तरूण मुलांनी केली. ती तिन मुल म्हणजे अमेरिकेतील चॅड हुर्ले,स्टिव्ह चेन आणि जावेद
करीम.
Read more




