• स्वागतम!!

    स्वागतम!!

    GanSun Inc. च्या मराठी; व्हर्जन वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

  • यांनी जग बदललं!!

    यांनी जग बदललं!!

    या IT कंपन्यांनी खरच जग बदलून टाकल

  • तुमच्या PC मध्ये कोण आहे?

    तुमच्या PC मध्ये कोण आहे?

    व्हायरस का तुमचा डेटा

  • सिक्यूरेटी टेक्निक्स

    सिक्यूरेटी टेक्निक्स

    Encryption आणि Decryption

  • तुम्हाला हॅकिंग बद्दल माहित आहे का?

    तुम्हाला हॅकिंग बद्दल माहित आहे का?

    तुमच्या कॉम्पुटर जगातला एक चोरटा जो तुम्हाला न सांगता तुमच्या PC मध्ये शिरतो आणि तुमचा डेटा हाताळतो.

Showing posts with label Windows XP. Show all posts
Showing posts with label Windows XP. Show all posts

विंडोज फोल्डर ट्रिक : डिलीट न होणारा फोल्डर

0 comments
    या लेखात आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम (Windows O.S) वरिल  फोल्डर वर वापरली जाणारी एक simple ट्रिक शिकणार आहोत. Normally आपण तयार केलेले फोल्डर्स हे दुसरे युजर्स Rename व Delete करू शकतात. पण अस त्यांना न करु देण्यासाठी तिथे कोणताही option नसतो. असे option देणारे सॉफ्टवेअर्स असतात तो भाग वेगळा,...पण इथे आपण कोणतेही सॉफ्टवेअर्स न वापरता हि ट्रिक्स वापरणार आहोत
    त्या अगोदर आम्ही तुमच्यासाठी एक चॅलेंज देतो जर तुम्ही त्यात यशस्वी झालात तर तुम्ही १ कोटि रुपये जिंकू शकता.......!!
    "अरे बापरे! १ कोटि,कस शक्य आहे?",..."काही फेकतोय...आणि देणार कोण एक कोटि?".....आम्हाला माहिती आहे वरील वाक्य ऐकून तुमच्या अश्याच प्रतिक्रिया येतील.....ठीक आहे...OK....OK आम्ही गंमत करत आहोत. पण तरीही चॅलेंज स्वीकारायला काय जातय.
    चॅलेंज हे आहे कि तुम्हि पुढिल नावाचा फोल्डर करुन दाखवा - con,aux, lpt1, lpt2, lpt3 up to lpt9. नाही ना जमल....जमनारच नाही कारण हि नावे विंडोज ओ.एस स्वतःसाठी reserve ठेवली आहेत आणि ती नावे आपण वापरु शकत नाही.
    पण या ट्रिकद्वारे आपण त्याच नावाची फोल्डर्स तयार करून त्यात आपल्या फाईल्स सुरक्षित ठेवु शकतो. पुढिल सुचना नीट वाचून त्याप्रमाणे करा -:
१. विंडोजच्या डाव्या बाजुला असणार्‍या हिरव्या 'START' बटन वर click करा.

२. मग 'RUN' Option वर click करा [ Shortcut साठी Win+R ].

३. मग 'RUN' विंडोवर cmd टाईप करा...आणि Enter बटण दाबा.


४. पण एक लक्षात घ्या हे फोल्डर तुम्ही C: ड्राईव्ह वर तयार करु शकत नाही.
५. आता काळी विंडो आल्यावर त्यात D: किंवा E: टाईप करा...आणि Enter बटण दाबा.
६. मग md con\ टाईप करा...आणि Enter बटण दाबा. फोल्डर तयार होईल.


 

७. फोल्डर तयार झाल्यावर त्यात तुमच्या फाईल्स तुम्ही सुरक्षित ठेवू शकता....कोणीही तो फोल्डर डिलीट व रिनेम करू शकत नाहि.

पण आता तुम्हालाच हा फोल्डर डिलीट करायचा असेल तर....

१. कमांड प्रोम्प्ट ओपन करा.[win+R]
२. ज्या ड्राईव्ह वर फोल्डर आहे त्याच नाव टाइप.( जस D: E: )
3. मग rd con\ टाईप करा. फोल्डर नाहिसा झाला असेल.


 
 


Read more

स्वतःच्या कॉम्पूटरची माहिति जाणून घ्या.

0 comments

बरयाच वेळेला आपण कॉम्पूटर/लॅपटॉप घेताना फसतो.आपल्याला एक चांगल्या क्वालीटिचा कॉम्पुटर/लॅपटॉप हवा असतो पण कॉम्पुटरची पूरेशी माहीती नसलेले बरेच वेळा फसले जातात.कॉम्पुटर/लॅपटॉप फक्त बाहेरून छान दिसला म्हणजे तो चांगला असे मूळीच नाही. एकदा विकत घेतलेली वस्तू परत करता येत नाही...म्हणुनच कॉम्पुटर/लॅपटॉप विकत घेताना त्याचा संपुर्ण विचार करून घ्यावा. समजा सर्व विचार करून तुम्ही एक कॉम्पुटर घ्यायला गेला आणि एक कॉम्पुटर/लॅपटॉप तुम्हाला आवडला.आवडलेल्या कॉम्पुटरच/लॅपटॉपच Configuration तुम्ही सेल्समॅनला विचारता,"हा लॅपटॉप मला खुप आवडला आहे...तुम्ही मला ह्या लॅपटॉपची माहीती द्या"...एक जाणून घ्या प्रत्येक सेल्समॅन स्वतःच्या शॉप मध्ये ठेवलेल्या वस्तूंची वाह वाहच करतो कारण त्याला ती वस्तू विकायची असते. सेल्समॅन तुम्हाला लॅपटॉपच्या चांगल्या बाजू सांगतो. त्याचे Weak Point तो समजावून सांगत नाही. मग अशा वेळी आपल्याला आवडलेला लॅपटॉप नेमका कसा आहे , हे जानून घेण्याचे काही मार्ग आहेत का? असेल तर कोणते? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील....ते सोडवण्यासाठी खुपच सोपे मार्ग खाली दिलेले आहेते :-

1. सर्वात सोपा मार्ग म्हणजे My Computer च्या लोगो वर जाऊन Right Click करा नंतर Properties हा option निवडा.......Yes done it!! कॉम्पुटर/लॅपटॉप ची माहीती तुमच्या स्क्रिन वर दिसेल. (For Shortcut: Press “Win+R” then type in Run Window “sysdm.cpl”)



2. वरचा मार्ग तुम्हाला फक्त तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमची,CPU ची आणि RAM ची माहीती देईल जर तुम्हाला खोलात जाऊन संपुर्ण कॉम्पूटर हार्डवेअरच्या एक एक पार्टची माहीति मिळवायची असेल तर START मेनू वर जाऊन Run.. हा option निवडा...नंतर एक Window येईल त्यात msinfo32 अस type करा...एका सेकंदात तुम्हाला तुमच्या हार्डवेअरच्या एक एक पार्टची माहीति मिळेल. (For Shortcut: Press “Win+R” then type in Run Window “msinfo32”)






Read more